सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा :- तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना , सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा ,जेष्ठ नागरिक संघटना देऊळगाव राजा , व जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०७वी पुण्यतिथी व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची१०७वी जयंती विरंगुळा भवन येथे आज साजरी करण्यात आली , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा येथील अध्यक्ष प्रकाश खांडेभराड, गोविंदराव अहिरे, मधुकरराव मान्टे होते सर्वप्रथम लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी प्रा विजय रायमल,रमेश नरोडे, प्रा अशोक डोईफोडे, शांतीलाल निरफळे, प्रकाश खांडेभराड यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, याप्रसंगी प्रकाश अहिरे, गोविंदराव बोरकर, मधुकरराव धुळे,कैलासराव शेळके, सौ.आशाबाई शेळके, बाबुलाल शिवरकर, , पंडितराव पाथरकर, रामदास कुलथे, मार्तंड आप्पा घिके, घनश्याम भंडारे, अरुण सपाटे, दिनकरराव जाधव, बबनराव कासारे, उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश अहिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव गोविंदराव बोरकर यांनी केले,यावेळी जनसेवा सामाजिक संघटना चे सदस्य श्री बबनराव कासारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला,शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



