महात्मा गांधी विद्यालय येथे लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :_ महात्मा गांधी विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षिका माधुरी मस्की,पर्यवेक्षक श्री. दत्तू वेडमे उपस्थित होते.
सर्वप्रथम लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,या प्रसंगी कु जिया पठाण, दिपाली पाचभाई, श्री. प्रशांत धाबेकर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला,या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु मयुरी माकोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु प्रांजली थेरे मॅडम यांनी केले. या कायक्रमा प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



