ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिपरी (देशमुख) परिसरात पाणीच पाणी

कोच्ची–मुरसा मार्ग पुरामुळे बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        वर्धा नदीला ३१ जुलै रोजी आलेल्या पुरामुळे भद्रावती तालुक्यातील पिपरी (देशमुख) परिसर जलमय झाला असून पिपरी–कोच्ची–मुरसा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पिपरी (देशमुख) गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पिपरी येथून कोच्ची–मुरसा मार्गावर दोन्ही नाल्यांना आलेल्या पूरामुळे पुलावर सुमारे पाच फूट पाणी आल्याने हा मार्ग शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७ वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

पूराच्या पाण्यामुळे नाल्यालगतच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून सोयाबीन व कापूस पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. तसेच कोच्ची–घोनाड परिसरातील नाल्यालाही पूर आल्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या हंगामी पिकांवर पाणी फिरल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

पूराचे पाणी ओसरल्यानंतर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये