ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन पीडितांची ओळख सार्वजनिक करू नका

वर्धा पोलीसांचे जनतेला आवाहन

चांदा ब्लास्ट

पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा यांच्यामार्फत जनतेस कळकळीचे आवाहन करण्यात येते की, पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) हद्दीत पोक्सो कायद्यांतर्गत एक गंभीर गुन्हा नोंद असुन त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा खुन झाला आहे. अशा संवेदनशील प्रकरणात पीडितेचे नाव, छायाचित्रे, पत्ता इत्यादी माहिती व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब इत्यादी समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करणे गंभीर गुन्हा असून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

कायदेशीर तरतुद :

पोक्सो कायदा, २०१२, कलम २३ कोणत्याही प्रसार/समाजमाध्यमातून अल्पवयीन पीडिताचे नाव, छायाचित्र, पत्ता, शाळा, कुटुंब किंवा ओळख पटेल अशी कोणतीही माहीती प्रसिध्द करणे प्रतिबंधित आहे. उल्लंघन करणाऱ्यास ६ महिने ते २ वर्षांपर्यंत कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते.

भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३, कलम ७२ विधिसंघर्षीतलैंगिक अत्याचाराच्या पीडितेची ओळख उघड करणे हा दंडनीय अपराध आहे, असे केल्यास २ वर्षांपर्यंत कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते.

अल्पवयीन न्याय कायदा, कलम ७४ विधीसंघर्षीत बालक किंवा पीडित अल्पवयीन बालकाची ओळख उघड करणे हा दंडनीय गुन्हा असुन ६ महिन्यांपर्यंत कारावास किंवा २ लाखांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात,

नागरिकांना विनंती :

पीडितेचे नाव, फोटो, व्हिडिओ, शाळा किंवा कुटुंबाची ओळख पटेल असा कोणताही मजकूर तयार करू नये, शेअर करू नये किंवा फॉरवर्ड करू नये,

असे व्हिडिओ किंवा पोस्ट कोणाच्या निदर्शनास आल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा सायबर पो.स्टे. वर्धा येथे कळवावे.

जबाबदार नागरिक म्हणून पीडितांच्या गोपनीयतेचा सन्मान करा व कायद्याचे पालन करा.

अफवा पसरवू नयेत; अधिकृत पोलीस माहितीवरच विश्वास ठेवावा.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वर्धा जिल्हा पोलीस विभागामार्फत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये