ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंमली पदार्थ विक्री प्रकरणातील फरार आरोपीला हिंगणघाट पोलिसांची अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

हिंगणघाट पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री प्रकरणातील फरार आरोपीला तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदाराच्या मदतीने अटक करण्यात यश मिळविले आहे.

हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 850/2026अन्वये एनडीपीएस कायद्यांतर्गत अंमली पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पियुष उर्फ मस्तान राजू मुसळे वय 27वर्ष रा. गोमाजी वॉर्ड हिंगणघाट निखिल मनोज रामन वार वय 25वर्ष रा. शास्त्री वॉर्ड हिंगणघाट जय वसंतराव चुटे वय 21वर्ष रा संत ज्ञानेश्वर वॉर्ड हिंगणघाट कार्तिक वसंतराव हमदं वय 29वर्ष रा. संत तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट आणि रितिक उर्फ प्रकाश खोडे वय 26वर्ष रा माता मंदिर वॉर्ड हिंगणघाट यांच्यासह एकूण पाच आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. तपासादरम्यान महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गतही कलमे वाढविण्यात आली.

या गुन्ह्यातील आरोपी पंकज प्रभाकर साठवणे (रा. सोमवारी वॉर्ड, सक्करदरा, नागपूर) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याच्याविरुद्ध नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर जिल्ह्यासह विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, घरफोडी, शस्त्र कायदा, अंमली पदार्थ विक्री (एनडीपीएस) यांसह तब्बल २८ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेत १७ जुलै २०२६ रोजी अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक,श्री. सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारीसुशील कुमार नायक हिंगणघाट यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच हिंगणघाट पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये