ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त

२२ जुलै रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर:- भाजपा चंद्रपूर जिल्हा महानगरभाजयुमो व भाजपा ओ.बी.सी. मोर्चाच्या वतीने मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता महेश भवनतुकूमचंद्रपूर येथे इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षेमधील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांची नोंदणी कार्यक्रमस्थळी सायंकाळी ४ वाजेपासून सुरु करण्यात येईल.

दरवर्षीप्रमाणे यंदाही होत असलेल्या या गुणवंत विद्यार्थी सन्मान कार्यक्रमास पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री मा. हंसराजजी अहीरचंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून कार्यक्रमास भाजपा चंद्रपूर महानगर पदाधिकारीभाजयुमो पदाधिकारी व भाजप ओ.बी.सी. मोर्चाचे महानगर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. तरी विद्यार्थीपालक शिक्षकवृंदानी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये