ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा वाहतूक शाखेतर्फे आर्वी येथे कोंडीमुक्त अभियान अंतर्गत कर्कश आवाज आणि डुप्लिकेट सायलेन्सरची संयुक्त कारवाई

विजयकुमार घुले सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली 194 केसेस व 2,55,000/-रुपयांचा दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 29/10/2026 रोजी वाहतूक शाखा वर्धा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आर्वी येथे कोंडीमुक्त अभियान राबविण्यात आलेले असून यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी आर्वी पोलीस स्टेशन अतंर्गत गांधी चौकात तहसील चौकात पोलीस स्टेशन चौकात शिवाजी महाराज चौकात आर्वी बस स्थानक चौकात बंदोबस्त लावून दुचाकी वाहने तीनचाकी वाहने चारचाकी वाहने यांची तपासणी करण्यात आली.

यावेळी कर्कश आवाज करणारे दुचाकी वाहन आणि डुप्लिकेट सायलेन्सर किंवा ज्या वाहन चालकाकडे लायन्सन नाही किंवा वाहनांचे कागदपत्रेही नाहीत आणि अल्पवयीन मुलांना व मुलींना वाहन चालविण्यासाठी देणे अश्या एकूण वाहनचालक लोकांवर 194 केसेस करण्यात आल्या आहेत आणि 2,55,000/- रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून वसूल करण्यात आला आहे सदरची हि कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार घुले वर्धा यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भांडेकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धीरज पांडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतिश वैरागडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मसराम पोलीस शिपाई किशोर माहुरकर यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये