ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पावणा नियतक्षेत्रात अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

वनविभागाची कारवाई : ट्रॅक्टर व ट्रॉली मालकांविरुद्ध वनगुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ वनपरिक्षेत्रांतर्गत पावणा नियतक्षेत्रातील राखीव वनक्षेत्रात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच वनविभागाने शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास कारवाई करीत ट्रॅक्टर व रेतीची ट्रॉली जप्त केली. या प्रकरणी संबंधित वाहनमालकांविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पावणा नियतक्षेत्रातील राखीव वन कक्ष क्रमांक ९ मधील नाल्यातून विनापरवाना रेतीचे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी युवो टेक ५७५ डीआय कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच-३४-सीआर-४८५२ आणि लाल रंगाची ट्रॉली क्रमांक एमएच-३४-सीआर-४४३१ आढळून आली.

सदर ट्रॅक्टर पावणा येथील प्रदीप हरिदास घागी यांच्या मालकीचा, तर ट्रॉली पावणा येथील प्रभुदास घागी यांच्या मालकीची असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. वाहनचालकांकडे रेती उत्खनन व वाहतुकीसंदर्भातील आवश्यक परवानगीची कागदपत्रे मागितली असता, ती सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे वनविभागाने ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करून संबंधित मालकांविरुद्ध वनगुन्हा नोंदविला.

ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती के. डब्ल्यू. धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहाय्यक जे.के.लोणकर, मासळचे कक्ष अधिकारी, कु. पी. बी.तपासे, वनरक्षक पावणा (अति.) अनिल शेंदरे, अमर किन्नाके, किशोर शेडामे आणि अमरदीप कोल्हे यांनी केली.

दरम्यान, राखीव वनक्षेत्रातील अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी वनविभागाकडून पुढील काळातही गस्त व शोधमोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये