ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          भद्रावतीत शहरात दोन दिवसीय श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम नाभिक समाज बांधव व भाविकांच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना मोरोतराव लांडगे (से. नि. शिक्षक) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. “आपल्या परिसरात काही दान देणारे, दानशूर आहेत. ज्या काही आपल्या योजना असतील, समस्या असतील त्या आपापल्या माध्यमातून करायच्या. ज्या काही अपेक्षा आहेत, त्या सभेमध्ये, आमसभेमध्ये मांडाव्या. देणारे भक्त आहेत, दाता काही कमी पडू देत नाही. ” ‘मांगने से मिलता नही’. आत्मीयता,भाव निष्ठा हवी”. मागितले तर सरळ कोणी देत नाही. फक्त आत्मीयता असली तर आपोआपच देते. भगवंताकडे काय कमी आहे? काहीच कमी नाही. पण मागणारा दाता तसा भाविक आणि निर्भयता असावा.” असे प्रतिपादन केले.

यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी मारोतराव लांडगे, सत्कारमुर्ती सुनील नामोजवार (नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष), सौ. रेखाताई खुटेमाटे नगरसेविका भद्रावती. प्रमुख पाहुणे अहेतेशाम अली (माजी. नगराध्यक्ष वरोरा), सौ. मायाताई जमदाडे, गजाननराव घुमे (से. नि. शिक्षक), माजी अध्यक्ष बंडू व्ही. लांडगे व पांडुरंग हणुमंते (अध्यक्ष, नाभिक सलून दुकान असोसिएशन भद्रावती) उपस्थित होते.

या दोन दिवसीय कार्यक्रमात श्रीं.ची घटस्थापना, पूजा व आरती, आरोग्य शिबिरात रोगनिदान व औषधोपचार करण्यात आले या शिबिरांचा ९० जणांची आरोग्य तपासणी व औषद वाटप करण्यात आले याकरीता डॉ. ऐश्वर्या महारले, डॉ. कोमल देऊलकर, डॉ. नितीन डाखोरे, सचिन टांगे, नयना लोनकर, पविना चटकी (आशा वर्कर), माधुरी गोवारदिपे (आशा वर्कर) यांनी सहकार्य केले. महिला व मुलींकरिता विविध स्पर्धा, आनंद मेळावा (पाककला), सामुदायिक प्रार्थना, पोथीचे पारायण आदी कार्यक्रम घेण्यात आले.

रात्री ग्रामगीताचार्य रवि पचारे महाराज व रविकांत लांडगे यांनी भारुडांतून प्रबोधन व नाट्यकला सादर करून उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले व हसून हसून पोट दुखविले.

दुसऱ्या दिवशी सामुदायिक ध्यान, श्रींचा अभिषेक, पूजा व आरती, पालखी सोहळा व शोभायात्रा (नगाजी महाराज देवस्थान ते मेन रोड जुना बस स्टँड ते नग मंदिर ते परत नगाजी नगर परिसरात), जाहीर कीर्तन व गोपाळ काला ह.भ.प. वैष्णवी अतकरे (आळंदी) यांच्या हस्ते पार पडला.

दुपारी २ ते ४ या वेळेत सत्कार समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यात सौ. रेखाताई खुटेमाटे (नगरसेविका, आरोग्य सभापती नगरपरिषद भद्रावती) व सुनीलभाऊ नामोजवार (नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष भद्रावती) यांच्यासह गुणवंत विद्यार्थी व महिला स्पर्धकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजाननराव घुमे यांनी केले, सूत्रसंचालन संकेत जमदाडे व रोशनी शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष रवींद्र हनुमंते यांनी केले. सायं. ६ ते ९ महाप्रसाद व सायं. ७ ते १० सुगम संगीत आर्केस्ट्रा, भक्तीगीते, भावगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अध्यक्ष रवींद्र हनुमंते, कार्याध्यक्ष हरीश शे. घुमे, सचिव सचिन प्र. नक्षिणे, उपाध्यक्ष सुरेशराव जमदाडे, सतीश मांडवकर, कोषाध्यक्ष पांडुरंग हनुमंते, सुधीर लांडगे, सहसचिव जितेंद्र नागतुरे, सागर घुमे, प्रशांत ना. नक्षिणे, बंडू व्ही. लांडगे, गोपाल आस्कर, सचिन मांडवकर, सेनापती दैवलकर, हणुमान नक्षिणे, सौ. मोनाली जांभुळकर,सौ. रागिनी सुत्रपवार, सौ. शालिनी शेंडे, सौ. भुवनेश्वरी निंबाळकर, सौ, सविता लांडगे व समस्त नाभिक समाज बांधव यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये