ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस व इंदिरा गांधी स्मृतिदिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस तसेच भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन व आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. तिरुपती बामणे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. ताकसांडे मॅडम व प्रा. जहीर सर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी असलेले अतुलनीय योगदान, संस्थानांचे विलीनीकरण करून देशाच्या एकीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य तसेच त्यांचे राष्ट्रनिष्ठ विचार यांवर प्रकाश टाकला. त्याचबरोबर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकीय, सामाजिक व राष्ट्रीय क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. टेकाडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अशोक सातारकर सर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. राजेश बोळे, प्रा. अनिल मेहरकुरे, प्रा. शिल्पा कोल्हे, प्रा. डफाडे, प्रयोगशाळा सहाय्यक श्री. करण लोणारे, कु. स्नेहल चांदेकर, शिपाई श्री. शशिकांत भाऊ यांनी विशेष सहकार्य केले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.

राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये