ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीत कोजागिरी स्नेहमिलन सोहळा संपन्न

भाजपा तालुका व शहर कमिटीचे आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने काल (३० ऑक्टोबर) गोंडपिपरी येथे कोजागिरी पौर्णिमा व स्नेहमिलन सोहळा तसेच शारदोत्सव व दुर्गोत्सव सजावट स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळा आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष दीपक सातपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार, वैष्णवी बोडलावार, नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, माजी नगराध्यक्षा सविता कुलमेथे, ज्येष्ठ नेते सुहास माडुरवार, दीपक बोनगिरवार, शिवसेना नेते सुनील संकुलवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितेश मेश्राम, परीक्षक प्रा. संतोष बांदुरकर, किशोर भोयर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कोजागिरी व स्नेहमिलन सोहळ्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आपुलकी व सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो, राजकीय व सामाजिक जीवनात काम करीत असताना कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी असे स्नेहसोहळे एक हक्काचे व्यासपीठ ठरतात. गोंडपिपरी तालुक्यातील प्रत्येक गावांत केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून विकासकामांना गती दिली जात असून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, आपण सदैव कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास आमदार देवराव भोंगळे यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रसंगीच,भाजपाच्या वतीने शारदोत्सव व दुर्गोत्सव सजावट स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण सुद्धा केले. विजेत्या स्पर्धकांचा आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दीपक सातपुते यांनी केले तर ॲड. अरुणा जांभूळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेरोशायरीच्या माध्यमातून आपल्या बहारदार सूत्रसंचालनाने राजेश डोंगरे यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

यावेळी भाजपाचे गोंडपिपरी तालुका महामंत्री निलेश संगमवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष राकेश पून, राकेश साखलवार, वैभव बोनगिरवार, शिथिल लोणारे, प्रवीण धोडरे, शांताराम काळे, मनोज वनकर, भास्कर गायकवाड, अनिल झाडे, जितेश वेगीनवार, संतोष मुगलवार, अमित वेगीनवार, गणेश डहाले, कुशाब कानकाटे, सचिन चिंतावार, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा स्वाती वडपल्लीवार, नगरसेविका शारदा गरपल्लीवार, कलावती पुप्पलवार, तेजस्विनी भगत, भारती साकलवार, मनीषा मडावी, रंजना रामगिरकर, रंजना अम्मावार, अनुजा बोनगिरवार, शुभांगी वनकर यांचेसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये