ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :_ देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना, सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे आज लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक संघटना चे अध्यक्ष प्रा विनायक कुळकर्णी, गोविंदराव अहिरे अरुण सपाटे,होते.

सर्वप्रथम सरदार वल्लभभाई पटेल तसेच श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी रमेश नरोडे, प्रा अशोक डोईफोडे, गोविंदराव बोरकर,शांतीलाल निरफळे, मधुकरराव धुळे, बाबुलाल शिवरकर, घनश्याम भंडारे, सन्मति जैन, प्रकाश अहिरे, पंडितराव पाथरकर, प्रा विजय रायमूल,दिनकर जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी सरदार वल्लभभाई पटेल व श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, संचालन रमेश नरोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंदराव बोरकर यांनी केले यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये