गांजा अंमली पदार्थाची वाहतूक व विक्री करणाऱ्या गुन्हेगारावर आर्वी पोलीसांची धडक कार्यवाही
5 किलो गांजा अंमली पदार्थासह 2 लाख 28 हजार 720/-रु. चा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा पोलीस अधीक्षक मा.श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे सर्व पोलीस स्टेशनला आदेशीत केले. त्या अनुषंगाने दिनांक 31/10/2026 रोजी आर्वी पोलीसांना मुखबीरतर्फे खबर मिळाली की, दाऊतनगर, आंबेडकर वार्ड, येथे राहणारा शेख गुड्डू शेख आशिक हा आज दिनांक 31/10/2026 चे पहाटे त्याचे मोपेड गाडीने नागपूर येथून गांजा अंमली पदार्थ आर्वी येथे चिल्लर विक्री करीता घेवून येत आहे. अशा प्राप्त खात्रीशिर खबरेवरुन आर्वी ते वर्धा रोडवरील एस.टी. डेपोचे समोर पोलीस स्टाफ, पंच, महसूल विभागाचे अधिकारी व फॉरेन्सीक टिम यांचेसह सापळा रचला.

त्यानंतर काही वेळाने एक संशयीत मोपेड वाहन येतांना दिसल्याने पोलीस स्टाफचे मदतीने वाहन थांबविले असता मोपेड वाहन चालक हा शेख गुड्डू शेख आशिक असल्याचे निदर्शनास आल्याने पंचांसमक्ष वाहनाची पाहणी केली असता वाहनावर एका स्कुल बॅगमध्ये प्लास्टीक पिशव्यांमध्ये गांजा अंमली पदार्थ असल्याचे दिसून आले. त्यानुसार मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करुन 1) निव्वळ गांजा अंमली पदार्थ 4.910 ग्रॅम किंमत 98,200/-रु. 2) टि.व्ही.एस. कंपनीची NTORQ विना क्रमांकाची मोपेड किंमत 1,20,000/-रु. 3) विवो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट किंमत 10,000/-रु. 4) NIKE कंपनीची काळी बैंग किंमत 500/-रु. 5) प्लास्टीक पन्न्यां किंमत 20/-रु. असा एकुण जुमला किंमत 2,28,720/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी शेख गुड्डू शेख आशिक वय 43 वर्षे रा. दाऊतनगर, आंबेडकर वार्ड, आर्वी याचेविरुध्द कलम 8(c), 20(b), ii(b), 29 NDPS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही, मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी श्रीमती वंदना कारखेले यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे, पोलीस हवालदार निलेश पेटकर, मंगेश वाघाडे, पोलीस अंमलदार सुरज मेंढे, आकाश चोरपगार, रोशन टेंभरे, बाबासाहेब गवळी सर्व नेमणूक पोलीस स्टेशन आर्वी यांनी केली.



