महात्मा गांधी विद्यालय येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी.
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच पहिल्या महिला पंतप्रधान प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उप मुख्याध्यापिका माधुरी मस्की, पर्यवेक्षक श्रीदत्ता येडमे होते.
सर्वप्रथम सरदार वल्लभभाई पटेल तसेच श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल व श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रिया दुर्गे यांनी प्रकाश टाकला, संचालन व आभार प्रदर्शन श्वेतलाना टिपले यांनी केले, यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



