ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाहतूक नियमाचे पालन आणि व्यसन मुक्ती बाबत वर्धा पोलिसांची शाळा व कॉलेज येथील विध्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयात अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतुक नियमांचे नागरीकांनी पालन करावे तसेच वर्धा जिल्हयात होत असलेल्या गुन्हयाबाबत तसेच व्यसन मुक्तबाबत मा. पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब व मा. अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे साहेब वर्धा जिल्हा यांचे मार्ग दर्शनाखाली जिल्हातील अपघाताचे प्रमाण, गुन्हयाचे प्रमाण तसेच व्यसनाचे प्रमाण कमी करण्याकरीता बी.डी. देशमुख कॉलेज सेवाग्राम येथे NCC च्या विद्यार्थी यांना आज दि. 17/07/2026 रोजी मार्गदर्शन शिबीरामध्ये वाहतूक नियमाचे पालन करावे जसे दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्ट चा वापर करावा, गुड टच, बेंड टच, डायल 112, 108, 1098, सायबर फॉड, महिला सुरक्षा बाबत कायदे, व व्यसन मुक्ती शिबीराबाबत सर्व NCC विद्यार्थी, 400 विद्यार्थी, व शिक्षक हजर असुन त्याबाबत पो.नी विलास पोटील वाहतुक नियंत्रण शाख, वर्धा यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

तरी सदर वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे व गुन्हेगारीवर आळा बसावा, व्यसन मुक्तीवर आळा बसावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे कडून नागरीकांना करण्यात येत आहे.

विलास पाटील पोलीस निरीक्षक वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये