मनिषा पापडे यांचे मरणोत्तर नेत्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय क्षेत्रात काम करत असलेले डॉ. योगेश व डॉ. संतोष पापडे यांच्या मातोश्री सौ. मनिष मिलिंद पापडे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने दिनांक 30 ऑक्टोंबर 26 रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या परिवारातील सदस्यांनी त्यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व जायंटस परिवाराचे डॉक्टर अशोक काबरा व सिध्देश्वर मिनासे यांचे सोबत संपर्क साधला.
वरून यांनी जालना येथील गणपती नेत्रालयाचे डॉ.शुभांगी अतकरी व त्यांच्या चमुस बोलाऊन मनीषा यांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतले. त्यांच्या परिवारातील सदस्यांनी घेतलेल्या या महान निर्णयामुळे या पृथ्वीवरील 2 अंध व्यक्तींना हे सुंदर जग पाहण्याची संधी मिळणार आहे.
*नेत्रदान श्रेष्ठदान*
त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात पती, 2मुले,1 मुलगी, सुना नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.



