ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारू पिवुन दारूच्या नशेत वाहन चालविणा-या वाहन चालक यांचेवर वाहतूक नियंत्रण शाखा निरीक्षक विलास पाटील यांच्या आदेशानुसार धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतुक नियमांचे नागरीकांनी पालन करावे या करीता मा. पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब व मा. अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे साहेब वर्धा जिल्हा यांचे मार्ग दर्शनाखाली जिल्हातील अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता वरीष्ठांनी ब्रिथ अॅनीलाइझर सह संपूर्ण वर्धा जिल्हयात दि. 19/07/2026 नाकेबंदी, विशेष राबविण्यात आली त्या अनुशंगाने दि. 19/07/2026 रोजी यर्चा पेट्रोलींग दरम्याण ग्रेडपोउपनी राजेंश कंगाले ब.क 1139, सफी प्रकाश लोढेकर ब.क 894 पौहवा संतोष राठोड ब.क 1427, पोहवा युबराज राठेड ब.क 654, नापोशि आरीफ खान ब.क 170 पोशि दिलीप कामही व. क 163 यांनी गांधीपुतळा वर्धा येथे चेक केले असता नमुद 1) वाहन चालक कमांक MH 32 H 4421 टिव्हीएस चा चालक नामे गंगाधर साहेबराव सोळंके वय 30 वर्ष रा. अंदोरी त. देवळी जि. वर्धा यांला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळून आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणुन त्यांची निथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 218.2 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळुन आल्याने वाहन चालक यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

2) वाहन चालक कमांक MH 32 AZ 2279 हिरोहांडा चा चालक नामे संदीप मधुकरराव मंगूळकर वय 35 वर्ष रा. बोरगाव मेघे गिटीखदान दर्धा यांला बजाज चौक येथे चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळून आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 1428. mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळून आल्याने वाहन चालक यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

आहे. दि. 19/07/2026 नाकेबंदी, विशेष राबविण्यात आली त्या अनुशंगाने इतर पोलीस स्टेशन ने देखील खालील प्रमाणे केसेस केल्या

१) उपशाखा हिंगणघाट यांनी 185 दोन केस केल्या आरोपी क 1) नामे चैतन्य वसंतराव महाजन वय 53 वर्ष रा. संत ज्ञानेश्रवर वार्ड साळुंकी रोड हिंगणघाट, 2) समिर दिपकराव झोटींग वय 33 वर्ष रा. हिंगणघाट

2) पोस्टे समुद्रपुर यांनी 185 मोवाका च्या चार केसेस केल्या आहे. त्यामध्ये आरोपी क 1) गोवर्धन रामसिंग पाचे वय 37 वर्ष रा.ननी ता. किरणापुर जि. बालाघाट राज्य मध्यप्रदेश ह.मु वायगाव हळदया ता. समुद्रपुर, 2) संजय श्रवण उईके वय 54 वर्ष रा. करूळ एकुर्ती ता.जि. वर्षा समुद्रपुर, ३) खुशाल अरून वरखडे वय 31 वर्ष रा. हुरणखुरी ता. समुद्रपुर जि. वर्षा 4) रोशन किसनाजी धुर्वे वय 32 वर्ष रा. वायगाव (क) ता. समुद्रपुर जि. वर्धा

3) पोरटे अल्लीपुर यांनी 2 केसेस केल्या आरोपी क १) ज्ञानेश्रवर प्रभाकर वानखेडे वय 42 वर्ष रा कांचणगाव ता. हिंगणघाट 2) कार्तिक जयंत तुरक वय 21 वर्ष रा. रामनगर वर्धा

4) पोस्टे पुलगाव यांनी एक केस केली आरोपी क 1) रोशन ओमकार दहेकर वय 38 रा. पुलगाव वरून सन 2026 मध्ये पुर्ण वर्धा जिल्हयाच्या ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह च्या एकुण 267 केसेस, एकुण लायसन्स निलंबन प्रस्ताव 60 पाठविण्यात आले. एकुण 129/177 हेल्मेटच्या 3721 केसेस, अवैद्य प्रवासी वाहतुकच्या 66(1)/192 (अ) एकुण 113 केसेसे करण्यात आल्या आहे. वर्धा श पेट्रोलींग दरम्याण दारू पिवुन वाहन चालवु नये, हायवेवर टुव्हीलर चालवितांना हेल्मेट वापरावे, फोरव्हीलर चालवितांना सिटब्लेट लावावा जेणे करून अपघाताचे प्रमाण कमी होईल अशा वारंवार सुचणा देण्यात येत आहे व नागरीकाना आवाहन करण्यात येत आहे.

तरी सदर वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे कडून नागरीकांना करण्यात येत आहे.

विलास पाटील पोलीस निरीक्षक वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये