ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न

वार्ड वाशियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भद्रावती शहरातील गड्डमवार लेआऊट, उज्ज्वलनगर येथे रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता वृक्षारोपण उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या उपक्रमात एकूण ४० वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये विशेष म्हणजे वडाची १४, पिंपळाची ११ आणि कडूलिंबाची १५ रोपे लावण्यात आली. पर्यावरणाचे संरक्षण, हरित परिसराची निर्मिती आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमात जेष्ठ नागरिक धानोरकर, संजय माथनकर, विकास धोटे, प्रा. डॉ. उत्तम घोसरे, विलास ढुमणे तसेच समित गेडाम, कपिल मून, मोरेश्वर विद्ये, मदन मत्ते, सचिन काकडे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमात पर्यावरण, संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेश चे उपजिल्हाध्यक्ष अतुल कोल्हे यांची उपस्थिती होती. या वेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करण्याचा संकल्प केला.

या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींचे आभार मानण्यात आले. तसेच प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये