डॉक्टर्स असोसिएशनचेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
51 रक्तदात्यांनी केले रक्तदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथे कृषी दिन तसेच डॉक्टर्स डे चे औचित्य साधून 1 जुलै रोजी देऊळगाव राजा येथील डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन विरंगुळा भवन येथे करण्यात आले होते,आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. : रुग्णांसाठी देवदूत म्हणजेच डॉक्टर लोकांचे प्राण वाचवण्यासाठी तसेच अचूक इलाज करण्यासाठी डॉक्टरांना देवदूत संबोधल्या जाते.
एक जुलै डॉक्टर डे तसेच कृषी दिनानिमित्त देऊळगाव राजा येथील डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कायंदे, यांच्या अधिपत्याखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लाभला असून एकूण 51 रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून शिबिरामध्ये सहभाग नोंदविला यावेळी असोसिएशनचे डॉ. विशाल शिंदे, सचिव डॉ. उमेश मुंडे, कोषाध्यक्ष डॉ. बालाजी तायडे, डॉ. दत्ता मांटे, डॉ. प्रवीण तिडके, डॉ. वैभव वायाळ, डॉ. विठ्ठल देशमुख, डॉ. सुनील कुटे, डॉ. नितीन बनकर, डॉ. गोरख आढाव, डॉ, गौरव कोल्हे, डॉ. अक्षय मांटे, डॉ. भगवान खरात, डॉ. अशोक काबरा, डॉ. संतोष पापडे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील गणमान्य डॉक्टरांनी आपला सहभाग नोंदविला.



