ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजुरा येथे एकात्मिक आरोग्य समितीची सभा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या दिनांक *14 मे 2026* च्या *शासन निर्णय* अन्वये राज्यातील आरोग्य विषयक उपक्रम लोकाभिमुख गतिमान व बळकट करण्यासाठी एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती ही स्थापित करण्याच्या शासन निर्णय *निर्गमित* करण्यात आला होता सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने राजुरा विधानसभा क्षेत्र ची एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा *राजुरा विधानसभा चे लोकप्रिय आमदार माननीय श्री देवराव दादा भोंगळे साहेब* यांच्या अध्यक्षतेखाली आज उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह राजुरा येथे संपन्न झाली.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय आयुष्य अभियान राज्य शासनाने मार्फत राज्यात *ग्रामीण व नागरी क्षेत्रात विविध आरोग्य संस्थाना समन्वय* साधण्यासाठी महाराष्ट्र राज्यात विधानसभा क्षेत्र निहाय एकात्मिक आरोग्य समिती ग्रामीण भागात स्थापन करायची होती त्याच्याच अनुषंगाने आज *माननीय आमदार श्री देवराव दादा भोंगळे साहेब* यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा संपन्न झाली त्याला जिवती राजुरा कोरपणा व गोंडपिंपरी येथील मा. तहसीलदार मा. संवर्ग विकास अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी,महिला व बालकल्याण अधिकारी, उप अभियंता(सार्वजनिक बांधकाम विभाग), महावितरण, तसेच अशासकीय निमंत्रित सदस्य उपस्थित होते.

आरोग्यविषयक अनेक विषयांवर सदर सभेत चर्चा झाली आदिवासी *अतिदुर्गम डोंगराळ* तालुक्यांमध्ये १०२ व १०८ *रुग्णवाहिका उपलब्ध* करून देणे , वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथील बांधकाम विषयक पूर्ण करणे , महावितरण ला आरोग्य संस्थेमधील वीज कपात न करणे तसेच सर्व विभागांचे आपसात समन्वय साधून आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करण्याबाबत सूचना मा. आमदार श्री देवराव दादा भोंगळे साहेब यांनी दिल्यात.

आरोग्य विभागामार्फत तालुका आरोग्य अधिकारी कोरपणा व जिवती डॉ स्वप्निल टेंभे यांनी *तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना तालुक्यात दौरा करण्याच्या अनुषंगाने शासकीय वाहन उपलब्ध* करून देण्याची तर तालुका आरोग्य अधिकारी गोंडपिंपरी डॉ. पराग जवळे यांनी *ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ञ व स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली* .

मा आमदार महोदयांनी सार्वजनिक आरोग्य विभागातील *आरोग्य समस्याचे शासन स्तरावर निराकरण करण्याबाबत माहिती जाणून त्यावर उपाययोजना करण्यात येईल* असे सांगितले.

 सदर सभेला कोरपणा, गडचांदूर,जिवती,गोंडपिंपरी व राजुरा येथील वैद्यकीय अधीक्षक तसेच विधानसभा क्षेत्राच्या तील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व प्रभारी वैद्यकीय अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

सदर सभेचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी राजुरा डॉ.प्रकाश नगराळे यांनी केली. तर सूत्रसंचालन श्री कल्पक ठमके व आभार प्रदर्शन श्री जितेंद्र चुद्री यांनी मांडले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये