ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संत मुक्ताबाई पालखीचे श्री बालाजी नगरीत उत्साहात स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

श्री बालाजी महाराजांची पुण्यनगरी देऊळगाव राजा शहरात दि ३ जुलै रोजी संत मुक्ताबाई पालखीतील टाळकरी वारकरी मृदुंगाचार्य यांनी ‘ज्ञानोबा तुकाराम’ ‘जय हरी विठ्ठल’ जयघोषात भक्तीमय वातावरणात पालखीचे आगमन शहरात झाले.जागोजागी रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.संत मुक्ताबाई पालखी स्वागत समिती दे. राजा -नगरपरिषद देऊळगाव राजा -महसूल विभाग व पोलीस विभाग तसेच समस्त गावकऱ्यांच्या वतीने संत मुक्ताबाई पालखीचे उत्साही वातावरणात शहरात स्वागत करण्यात आले.

        संत मुक्ताबाई यांच्या पादुका ग्रामदैवत श्री बालाजी मंदिर येथे आणल्या तेथे पूजन करण्यात आले .श्री बालाजी संस्थांनच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले . धुडीराज महाराज मठ येथे स्वागत समितीच्या वतीने वारकरी टाळकरी आणि पालखीचे स्वागत करण्यात आले .मुक्ताबाई यांच्या पादुकाचे पूजन ओम पुरुषोत्तम सोनुने व परिवाराने केले यावेळीमहाआरती करण्यात आली . यानंतर समस्त वारकरी यांना सेवा समितीच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली . तसेच पालखी मुक्काम वारकऱ्यांना झोपण्याची व्यवस्था धुंडीराज महाराज मठ येथे नगरपरिषद प्राथमिक शाळा तसेच बालाजी भक्तांच्या वतीने आर्या लॉन्स व अस्मिता लान्स येथे करण्यात आली होती .विविध ठिकाणी पालखीसाठी सामाजिक राजकीय व प्रशासकीय स्तरातील भक्तांनी चहापाणी नाश्ता फराळ आधीची व्यवस्था केली होती .धुडीराज महाराज मठात पालखी मुक्कामी होती यावेळेस पंचकोशीतील हजारो भक्तांनी पादुका दर्शन घेतले

     श्री संत मुक्ताबाई पालखी स्वागत समिती व समस्त गावकरी यांच्यावतीने पालखीचे स्वागत व विविध व्यवस्था करण्यात आली .शहरातील सेवाभावी डॉक्टरांच्या वतीने वारकऱ्यांना वैद्यकीय सुविधा सेवाभावी स्वरूपात देण्यात आल्या यावेळेस समर्थ औषध शास्त्र विद्यालय डॉक्टर ताठे – वायाळ हॉस्पिटलचे डॉ वैभव वायाळ -तिरुपती हॉस्पिटलचे डॉ सुभाष शिंगणे,नागरे हॉस्पिटलचे डॉ नागरे ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा चे डॉक्टर व परिचारीका ‘ डॉ इत्यादींनी सेवा दिल्या .

         नगरपरिषद कार्यालयासमोर -आजी-माजी लोकप्रतिनिधी -तहसीलदार ,नगराध्यक्ष उपाध्यक्ष गटनेते नगरसेवक मुख्याधिकारी पोलीस निरीक्षक – विविध क्षेत्रातील मान्यवर भक्तगण आदींनी स्वागत केले.

       दिनांक 4 जुलै शनीवार रोजी सकाळी पाच वाजता देऊळगाव राजा शहरातून पालखीचे प्रस्थान जालन्याकडे झाले .विदर्भ मराठवाडा सीमेवर देऊळगाव राजा तालुका प्रशासन पोलीस प्रशासन व भक्तगणांच्या वतीने पालखीला निरोप देण्यात आला व पालखी ही जालना मार्गे पंढरपूर कडे मार्गस्थ झाली .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये