मणिकगड सिमेंटतर्फे बांबेझरी गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
माणिकगढ सिमेंट वर्क्स आपल्या सामाजिक दायित्व अंतर्गत वरिष्ठ उपाध्यक्ष मुकेश गहलोत व ई र हेड नवीन कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सतत समाजच्या विकासाठी नवं नवीन उपक्रम रबवतात.
त्याचाच भाग मनून अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट वर्क्स गडचांदूर आणि मानोली प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बांबेझरी गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिरात एकूण महिला व किशोरींनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. लाभार्थ्यांची RBC, हिमोग्लोबिन (Hb), रक्तदाब (BP) आणि रक्तातील साखर (ब्लड शुगर) यांची तपासणी करण्यात आली. तसेच सामान्य आजारांसाठी आवश्यक औषधांचेही मोफत वितरण करण्यात आले.
या शिबिरात डॉ. स्नेहा मोटे आणि डॉ. कमल केंद्रे यांनी लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. विशेषतः अंगणवाडीतील गर्भवती महिलांची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच त्यांना सुरक्षित मातृत्व आणि पोषणाबाबत योग्य समुपदेशन करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे आरोग्य शिबीर घेण्यात आलेत असे ई र हेड नवीन कौशिक यांनी सांगितले.



