ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सहकाराच्या बळावर मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम होईल : प्रा. विवेक सरपटवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           मच्छिंद्र मच्छुआँ सहकारी संस्थेच्या वतीने सहकार सप्ताहानिमित्त शनिवारी (दि. ४) सकाळी १० वाजता संस्थेचे अध्यक्ष दिलीप मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली “सहकार आणि मत्स्यव्यवसाय” या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भद्रावती येथील सुप्रसिद्ध व्याख्याते व ज्येष्ठ पत्रकार प्रा. विवेक सरपटवार यांनी मार्गदर्शन केले.

आपल्या व्याख्यानात प्रा. विवेक सरपटवार म्हणाले की, “सहकार ही केवळ आर्थिक चळवळ नसून परस्पर विश्वास, एकजूट आणि सामूहिक प्रगतीचा प्रभावी मार्ग आहे. मत्स्यव्यवसाय करणाऱ्या बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक मत्स्यपालन, जलस्रोतांचे संवर्धन आणि शासकीय योजनांचा लाभ घेतल्यास उत्पादनात वाढ होऊन आर्थिक सक्षमीकरण साधता येईल. सहकारी संस्था या मत्स्यव्यवसायिकांना बाजारपेठ, प्रशिक्षण, कर्जसुविधा आणि शासकीय योजनांशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असून, संघटित प्रयत्नांतून मत्स्यव्यवसाय अधिक लाभदायक आणि शाश्वत बनू शकतो.” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप मांढरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात “संस्थेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायिकांचे हित जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सहकाराच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायिकांनी एकत्र येऊन आधुनिक पद्धती स्वीकारल्यास रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि मत्स्यव्यवसायाला नवी दिशा मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी संस्थेचे संचालक राजेंद्र बगळे, सुधाकर मांढरे, लखन चटपल्लीवार, सुनील पारशिवे, श्रीराम नागपुरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक नरेंद्र पढाल यांनी केले. सूत्रसंचालन व आभार श्रीराम नागपुरे यांनी मानले. कार्यक्रमास संस्थेचे सदस्य व मत्स्यव्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये