मा.आ.निलय नाईक यांची वसंतराव नाईक परसबागेला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नागपूर शहरातील दिशादर्शी प्रेरणादायी वसंतराव नाईक परसबागेला मा.आ.निलय नाईक यांनी भेट दिली. त्यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांचे आयटी प्रमुख मा. रणजित आडे,नागपूर नगरीचे नायक मा.इंजि. आत्मारामजी चव्हाण, नायकीण सौ.मालूताई चव्हाण,कारभारी अॅड.बद्रीप्रसाद चव्हाण, खरबीचे नायक आणि सामाजिक कार्यकर्ते मा.पिरूसिंग राठोड हे प्रामुख्याने उपस्थित होते. अतिशय अल्पावधीत श्रीपतभाऊ राठोड यांनी परसबाग निर्मिती मागील उद्देश,विविधता आणि नाईक साहेबांचे विचार घरांघरात मनामनात पोहचविण्याची मनोदय व्यक्त केला.
ज्यायोगे प्रत्येक अंगण हिरवे अंगण- प्रत्येक अंगण आरोग्यदायी अंगण राहील ही संकल्पना आवर्जून मांडली. नागपूर सारख्या शहरात इमारतीच्या चौथ्या मजल्यावर श्रीपतभाऊ राठोड आणि परिवाराने साकारलेल्या बहुआयामी बहुउपयोगी आरोग्यदायी परसबाग ही खरोखरच समाजातील प्रत्येक कुटुंबांसाठी अनुकरणीय आणि अत्यंत गरजेची बाब असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी मा.आ.निलय नाईक यांनी व्यक्त केले.निश्चितपणे सपत्नीक भेट देण्याचे त्यांनी अभिवचन दिले. याप्रसंगी राठोड परिवाराकडून त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान करण्यात आला. कु.दिपाली आणि कु. अंजली श्रीपत जयश्री राठोड द्वारा लिखित वसंत बहार ही इंग्रजी पुस्तकही मुलींद्वारा भेट दिली.
याप्रसंगी मा.आ. निलय नाईक यांनी दोघींचे तोंडभरून कौतुक केले,मुक्तपणे संवाद साधला, मुलींना आशीर्वाद देवून त्यांचे मनोबल वाढवून प्रोत्साहीत केले आणि त्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी पुन्हा येण्याचे सांगितले.अतिशय व्यस्तेतील ही भेट,चर्चा परसबाग निर्मिती अभियानाला नवी गती आणि उभारी देणारी ठरली.



