अँड. बिहारी कांबळे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- समाजातील गरिबांना उन्नत आणि प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरनोपाय नाही. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे. हे हेरून अँड .बिहारी कांबळे यांनी नान्होरी सारख्या खेड्यात गरिबांसाठी १९६० ला शिक्षणाचे दरवाजे खुले केले, असे प्रतिपादन प्रवीण खोब्रागडे हे बिहारी कांबळे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते. ब्रह्मपुरी तालुक्यातील नान्होरी येथे दिनांक २जुलै २०२६ला सिद्धार्थ विद्यालय नान्होरीचे संस्थापक एडवोकेट बिहारी रामजी कांबळे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आनंद बिहारी कांबळे, उद्घाटक अ.भा. रिपब्लिकन पक्ष चे अध्यक्ष प्रवीण उर्फ बाळू खोब्रागडे चंद्रपूर, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ. सिद्धार्थ मेश्राम नांदुरा, प्राध्यापक सुजाता बुंदेले, प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे नेते अशोक निमगडे चंद्रपूर,ज्येष्ठ पत्रकार नेताजी मेश्राम, जीवन बागडे, प्राचार्य डॉ. राजेश कांबळे, माजी मुख्याध्यापक एस एस नगराळे, माजी मुख्याध्यापिका श्रीमती मंगर, ममता अजय कांबळे, प्राध्यापक मुकेश रामटेके, डॉ .मिलिंद रंगारी ,रितिक संजय कांबळे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी एड्. बिहारी कांबळे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी सिद्धार्थ विद्यालय नान्होरी येथील गुणवंत विद्यार्थी साहील बबन कोलते,कु.वेदांती मिसार,कु.मंजु देशमुख,कु.अक्षरा मेश्राम व सिद्धार्थ विद्यालय नान्होरीचे नाव लौकीक करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा, माजी मुख्याध्यापकांचा आणि अँड. बिहारी कांबळे यांच्या आप्तेष्टांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सिद्धार्थ विद्यालय नान्होरी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात अँड. बिहारी कांबळे यांचे आप्तेष्ट, सिद्धार्थ विद्यालयाचे शिक्षक,शिक्षिका, विद्यार्थी व गावकरी मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन इंजिनियर संजय कांबळे, ममता अजय कांबळे आणि सिध्दार्थ विद्यालयाचे वतीने आयोजन केले होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चना नाईक शिक्षिका, प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक भोजराज खोब्रागडे तर आभार प्रदर्शन अभिनीत गेडाम शिक्षक यांनी केले.



