ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्याध्यापक बबन भोयर सेवानिवृत्त 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित. महात्मा गांधी विद्यालय तथा उच्य माध्यमिक विद्यालय, सोनुर्ली (वन) येथील मुख्याध्यापक श्री बबन बापूराव भोयर, नियत वयोमानानुसार दिनांक 30/6/2026 ला 34 वर्ष सेवा करून निवृत्त झाले. 32 वर्ष शारीरिक शिक्षक म्हणून तर 2 वर्ष मुख्याध्यापक/प्राचार्य म्हणून सेवा केली. शा. शिक्षक काळामध्ये अनेक खेडाळू तालुका स्तर ते राज्य स्तर पर्यंत प्रावीन्य प्राप्त केले. प्रावीन्य च्या आधारे 10/12 विध्यार्थना नोकरीत लाभ मिळाला. अनेक विध्यार्थना ग्रेस गुणांचा टक्केवारीत फायदा घेतं उच्य शिक्षण घेतं आहेत.या निरोप कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री. व्ही. एम. थिपे सर व सचिव मा. श्री धंनजय जी गोरे, यांनी शॉल श्रीफळ व भेट वस्तु देऊन सत्कार केला. व दीर्घ व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सचिव धनंजय गोरे यांनी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा उल्लेख केला.तर

तसेच मा. श्री. व्ही. एम. थिपे सर यांनी अविरत कर्तव्यप्रति प्रामाणिक राहून कर्तव्य करण्याचा आदर्श श्री भोयर सर यांच्या पासून घ्यावा, तसेच सर्वात जास्त ओळखणाऱ्या शिक्षकांमध्ये भोयर सर होते. असा उल्लेख त्यांच्या कर्तव्यचा उल्लेख केला. पुढील आयुष्य दीर्घ निरोगी भरभराटीचे जाओ अशा शुभेच्छा दिल्या.

या प्रसगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी बहू संख्येने विध्यार्थी होते.

या प्रसंगी भावुकतेने विद्यार्थांनी सर्व कर्मचाऱ्यांनी निरोप दिला.

या प्रसंगी प्रा. पत्रकार यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर आभारप्रदर्शन कु. सलामा कुरेशी मॅडम यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये