स्व. जयश्री संजय हर्ष यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरजूंना रेनकोट वाटप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- मानव कुटी संशोधन केंद्र ब्रम्हपुरी यांच्या वतीने गरजु भगिनींना स्व. जयश्री संजय हर्ष यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रेनकोट वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम डॉ. संजय हर्ष यांच्या कुटुंबीयांच्या वतीने राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रम्हपुरी विधानसभा सभा क्षेत्राचे माजी.
आम. प्रा. अतुल देशकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ब्रम्हपुरीचे नगराध्यक्ष योगेश मीसार उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सेवाभावी कार्यातून समाजात सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश दिला.असे मनोगत व्यक्त केले. पावसाळ्यात गरजूंना संरक्षण मीळावे या सामाजिक उदेश्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय लांबे यांनी तर प्रास्ताविक डॉ. संजय हर्ष आणि आभार प्रा. चंद्रकांत विटाळकर यांनी मानले. याप्रसंगी प्रा. दिलीप जगनाडे, विलास खरवडे,नानाजी गराडे, फकीराजी कुवै आणि बहुसंख्येने बंधू -भगिनी उपस्थित होते.



