ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रींच्या नगरीमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो _ अरुण मोकळ 

मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या पदोन्नती बाबत सत्कार समारंभाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांची शासनाच्या नगरविकास विभागाने नुकतीच पदोन्नती केली आहे त्यांच्या या पदोन्नती निमित्ताने शहरातील श्री संत नरहरी नाथ महाराजांच्या मठात छोटेखानी सेवा समितीच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना अरुण मोकळ यांनी सांगितले की मी फार नशीबवान आहे की मला श्री बालाजी महाराजांच्या नगरीत सेवा करण्याची संधी मिळाली मी माझ्याकडून त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला व शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रशासक काळात विविध विकासासाठी कामे करण्याचा एक छोटासा प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत सविस्तर असे की येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी प्रशासक कार्यकाळात भरघोस विकासाची कामे केली याकरिता वेळोवेळी त्यांना लोकप्रतिनिधींनी निधी आणण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला शहरातील बहुतेक अतिक्रमणे काढून त्यांनी शहराला सुंदर बनवण्याकरता नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी केली.

शहरातील प्रत्येकांचे मुखावर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून नुकतेच काही मुख्याधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांचा “अ”वर्गामध्ये समावेश केला त्यांना मिळालेल्या पदोन्नतीच्या निमित्ताने श्री संत नररीनाथ महाराज मठ सेवा समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी हरिभक्त परायण मोहन महाराज पैठणकर हरिभक्त परायण उद्बोध महाराज पैठणकर,श्रीसंत नरहरिनाथमहाराज सेवा समितीचे सदस्य पंडितराव पाथरकर, ॲड.पुरुषोत्तम धन्नावत,सन्मती जैन, बळीराम मापारी,प्रकाश खांडेभराड, प्रकाश अहिरे,माधव गीते, पंकज वाघरुळकर, विलास अहिरे, व इतर भाविक भक्त उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये