ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घोराड येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

राज्य शासनाच्या आदेशानुसार 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आज घोराड येथील अंगणवाडी केंद्रात लसीकरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी पंचायत समिती सेलूचे विस्तार अधिकारी (आरोग्य विभाग) सुरेश चालक यांनी पल्स पोलिओ केंद्राला भेट देऊन कार्यक्रमाची पाहणी केली. त्यांच्या हस्ते श्रावस्ती शंकर पानबुडे (घोराड) व ई. वनश्री दिवाकर कंगाली या बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी आशा सेविका करुणा विजयराव झोंबाडे, अंगणवाडी सेविका योगिनी पराते, आरोग्य सेवक सुजित रामचंद्र मंडलिक तसेच आरोग्य कर्मचारी शालिनी सुशील पोथारे उपस्थित होते. पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या पाल्यांना पोलिओची मात्रा दिली.

आरोग्य विभागाने सर्व पालकांना 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीपणे व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये