ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दोन महिन्यांच्या मृत्यूशी झुंजीनंतर भूमिका भगतची प्राणज्योत मालवली 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2026 रोजी वर्धा येथील आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमादरम्यान मलखांब खेळताना गंभीर जखमी झालेल्या कु. भूमिका भगत हिची चार महिन्यांच्या मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर शनिवार, 27 जून 2026 रोजी संपली. तिच्या निधनामुळे आंबेडकरी व बौद्ध समाजात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग व मलखांबाचे सादरीकरण आयोजित करण्यात आले होते. यावेळी भूमिका भगत ही मलखांबाचे कौशल्य सादर करत असताना अचानक तिचा तोल जाऊन ती खाली कोसळली. या अपघातात तिच्या डोक्याला व मानेवर गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तिच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू होते.

मात्र सुमारे दोन महिन्यांच्या उपचारानंतरही तिची प्रकृती सुधारली नाही आणि 27 जून रोजी तिची प्राणज्योत मालवली. तिच्या निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अंत्यसंस्कारावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी, बौद्ध समाजबांधव तसेच नागरिक उपस्थित राहून तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान, भूमिका भगतच्या कुटुंबीयांनी कार्यक्रमाच्या नियोजन समितीवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. अशा धोकादायक खेळांचे आयोजन करताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व संरक्षक साधनांची व्यवस्था करणे आवश्यक होते. भविष्यात 14 एप्रिलसारख्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन योग्य नियोजन करावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये