गरीब नवाज तंजीम कमेटीतर्फे मोहर्रम निमित्ताने सेलू येथे शरबत वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि.26 जून 2026 रोजी मोहर्रम महिन्याच्या निमित्ताने गरीब नवाज तंजीम कमेटीतर्फे शरबत वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात नागरिक, प्रवासी तसेच परिसरातील भाविकांना थंडगार शरबताचे वाटप करण्यात आले.
मोहर्रम हा त्याग, बलिदान आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र महिना असून, करबला येथील शहीदांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात आला. शरबत वाटपाद्वारे बंधुभाव, एकता आणि समाजसेवेचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी गरीब नवाज तंजीम कमेटीचे पदाधिकारी व सदस्य तसेच गरीब नवाज मस्जिद कमेटीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाला हिम्मत अली शाह, हनिफ सय्यद, इम्रान पठाण, रिझवान शेख, मोबिन शेख, आदिल शेख, जुबेर, आरिफ, रजा, अरशद, रजा शेख, वसीम, ईशान, फैज, तोहीद, असलम पठाण,सोनू आदी सदस्य उपस्थित होते.उपस्थितांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. समाजात बंधुभाव, एकता आणि मानवतेची भावना दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.



