Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी संघर्ष करून आपला हक्क मिळवावा – डॉ प्रफुल नांदे

लोकमान्य गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे लोकमान्य गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रफुल नांदे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या यशासाठी संघर्ष करावा व आपला हक्क मिळवावा, ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष करून भारत देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्याप्रमाणे विद्यार्थ्याने प्रयत्नशील असायला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.

तर अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेऊन स्वतंत्र महाराष्ट्र व्हावा तसेच कामगार,दलितांना न्याय म्हणून देण्याचा प्रयत्न केला असे भाष्य केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका मनीषा मरसकोल्हे यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद मुसने, प्रा.राहुल ठोबरे,प्रा.एजाज शेख,प्रा.सचिन पवार,प्रा.रोशनी खाटे, प्रतीक मुन उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन माधुरी बावने हिने केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये