ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त मुख्यध्यापक मधुकर चापले यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील बालाजी हायस्कूल येथील मधुकर चापले हे नियत वयोमानानुसार मुख्यध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त बालाजी हायस्कूल येथे निरोप व सपत्नीक सत्कार समारंभाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चापले यांचा सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, मला संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे वेळोवेळी मिळालेले मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य तसेच सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्यानेच मी मुख्यध्यापक पदाची सेवा यशस्वीरित्या पार पाडू शकलो.

यावेळी बालाजी हायस्कूल येथील कु.प्रतीक्षा शंकर चव्हाण या विद्यार्थीनीने १० वीच्या मार्च २०२३ शालांत परीक्षेत विशेष गुणवत्ता व प्रथम क्रमांक व मार्च २०२२ मध्ये कु.आयुष्या जब्बार शेख यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल रुरल फाउंडेशनचे संस्थापक संभाजी कदम यांच्या हस्ते रोख पाच हजार व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.सदर कार्याक्रमाला आजी-माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये