Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खुशाबराव लोनबले पोलिस विरता पदकाने सन्मानित

पुढील देश सेवेसाठी मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव

चांदा ब्लास्ट
केंद्रीय सशस्त्र बल सी आर पी एफ च्या 85 व्या स्थापना दिनाचे आयोजनाप्रसंगी सी आर पी एफ संस्थेच्या वतीने खुशाबराव उपासराव लोनबले यांना आय बी चे डायरेक्टर श्री तपन कुमार डेका यांच्या हस्ते पुलिस विरता पदक देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक 27 जुलै 2023 रोजी सी आर पी एफ शौर्या संस्था दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
रात्री दिनांक 29 ऑगस्ट 2020 रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील गाव जडूरा परिसरात एका संयुक्त अभियाना दरम्यान एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा कार्मिकांवर अंदाधुंद फायर केला,प्रतिउत्तरात आपल्या प्राणांची चिंता न करता सिपाही खुशाबराव उपासराव लोनबले आणि त्यांचे दोन सहकारी हवलदार लोगनाथन व सिपाही नजर अहमद अंटू यांनी उत्कृष्ट युद्ध कौशल्य आणि कुशल रणनीतीने जैश-ए-मोहम्मदच्या १  आणि हिज्बुल्लाह मुजाहिदीनच्या २ कुख्यात आणि खुंखार आतंकवादींना ठार केले होते. या उत्कृष्ट युद्ध कौशल्य आणि विरतापूर्ण कार्यासाठी त्यांना राष्ट्रपतीद्वारा दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी विरता पोलीस पदक जाहीर करण्यात आले होते. या कार्यक्रमा प्रसंगी केंद्रीय रिजर्व पुलीस बलाचे महानिदेशक डॉ. सुजोय लाल थॉसेन यांच्या सह इतर वरिष्ठ अधिकारी, सी आर पी एफ चे जवान आणि वीर परिवार उपस्थित होते.
सिपाही खुशाबराव उपासराव लोनबले हे सिंदेवाही तालुक्यातील पवनपार या छोट्याशा खेड्यातून २०१७ मध्ये सी आर पी एफ या केंद्रीय सशस्त्र बलमध्ये भरती होऊन प्रशिक्षणानंतर अत्यंत संवेदनशील आणि आतांकवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुलवामा (जम्मू आणि काश्मीर) या ठीकाणी १८३ बटालियन मध्ये तैनात झाले आहेत. देश सेवेसोबतच त्यांना साहित्य क्षेत्रात रुची असून त्यांच्या कविता लेख अनेक वर्तमान पत्रातून प्रकाशित झाल्या आहेत.
त्यांना पोलिस वीरता पदक मिळाल्याबद्दल आणि पुढील देश सेवेसाठी मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये