ताज्या घडामोडी

प्राथमिक आश्रम शाळेतुन 5 विद्यार्थी पळाले – आश्रमशाळा प्रशासन होते साखरझोपेत

पहाटे 4 वाजताच्या सुमारास विद्यार्थ्यांनी ठोकली धुम - विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा तालुक्यातील एका प्राथमिक आश्रम शाळेतील 5 वी ते 7 वी दरम्यान शिकत असलेले 5 विद्यार्थी पहाटे 4 वाजताच्या सुमारास शाळेतुन पळून गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अहेरी तालुक्यातील 5 व्या वर्गात शिक्षण घेणारी 2 मुले व 7 व्या इयत्तेतील 3 मुले राजुरा तालुक्यातील एका आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी हे 5 विद्यार्थी पहाटे 4 वाजताच्या सुमारास आपले सामान घेऊन आश्रमशाळेतुन पळाली.

ह्या विद्यार्थ्यांनी पहाटेच्या वेळी ट्रक थांबवुन त्यातुन राजुरा बस स्थानकापर्यंत प्रवास करून पहाटे 5:30 च्या दरम्यान ते राजुरा येथे पोहचले. गावाकडे जाण्यासाठी हे विद्यार्थी बसची वाट बघत होते. दरम्यान सकाळी काही नागरिकांनी ह्या मुलांना बस स्थानकावर बघितले. त्याच वेळी एक पत्रकार तिथे गेला असता त्याला संशय आल्याने त्याने त्या विद्यार्थ्यांची चौकशी केली तेव्हा ते विद्यार्थी पहाटे आश्रम शाळेतुन पळून आल्याचे वास्तव समोर आले.

अखेरीस त्या पत्रकाराने प्रयत्नपूर्वक शाळेशी संपर्क साधुन विद्यार्थ्यांची माहिती कळविली व विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या स्वाधिन केले. मात्र शाळेतील विद्यार्थी पहाटेच्या वेळी शाळेतून पसार होतात, ट्रक थांबवून प्रवास करतात तरीही रात्र पाळीत काम करत असलेले शिक्षक, कर्मचारी अथवा वॉर्डन ह्यांना मुले शाळेत परत पोहचत पर्यंत काहीही कळत नाही ह्याला शाळा प्रशासन व व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरला असल्याचे स्पष्टपणे दिसुन येत आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना का पळून जावे लागले? काय आहे त्यांच्या समस्या व कुठली आहे ही घटना? कुठे असतात ह्यांचे आईवडील? व्हिडिओ सह संपूर्ण माहिती उद्याच्या भागात.

 

कृपया बातमी कॉपी करण्यापूर्वी 8999854266 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये