ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मृतकाच्या कुटुंबीयाना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा मदतीचा हात

नैसर्गिक आपत्ती निधी अंतर्गत चार लक्ष रुपयांचा निधी मंजूर

चांदा ब्लास्ट
 अतिवृष्टीतील पुरामध्ये भद्रावती तालुक्यातील पिपरी येथील अंकुश शामराव खेडेकर यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. आमदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांच्या प्रयत्नाने त्यांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निधी अंतर्गत चार लक्ष रुपये  मंजूर झाले. आज त्यांचे वडील शामराव खेडेकर यांना भद्रावती तहसील कार्यलयात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.
यावेळी तहसीलदार अनिकेत सोनवणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष  प्रशांत काळे, भद्रावती शहर काँग्रेस अध्यक्ष सुरेश गावंडे, प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, किशोर हेमके उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा नेहमी धानोरकर कुटुंबीयांनी प्रयत्न केला आहे. पुढे देखील हा प्रयत्न सुरूच राहील. त्यासोबत पावसाळ्यात विशेषतः युवकांनी नदी व इतर धोकादायक ठिकाणी आपला जीव धोक्यात टाकू नये असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये