ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समग्र शिक्षा समावेशित शिक्षणांतर्गत सावलीतील विद्यार्थ्यांवर नागपूरात शस्त्रक्रिया

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

समग्र शिक्षा समावेशित शिक्षण गट साधन केंद्र – पंचायत समिती,सावली अंतर्गत तालुक्यातील अस्थिव्यंग विद्यार्थ्यांचे प्रविरा हॉस्पीटल नागपूर येथे तालुक्यातील एकूण पाच विद्यार्थ्यांचे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आले.सावली तालुक्यातील कु.समीक्षा घोनमोडे-बोरमाळा,क्रिष्णा भोयर – साखरी,निर्जला कोटगले-निमगाव सुप्रिया कोवे – सावली व स्नेहा गावतुरे – व्याहाड खुर्द या पाचही विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय सावली येथुन १०८ क्रमांक गाडीने दिनांक २४/०७/२०२३ ला प्रविरा हॉस्पीटल रुग्णालयात पोहचवुन देऊन शस्त्रक्रिया झाल्यानंतर २८/०७/२०२३ ला विद्यार्थ्यांना त्याच्या घरापर्यंत पोहचविण्यात आले.तालुक्यातील पाचही विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असुन गट विकास अधिकारी यांचे प्रेरणेने व मान.गटशिक्षणाधिकारी पं.स.सावली यांचे मार्गदर्शनाखाली व गट साधन केंद्र,सावली अंतर्गत समावेशित तज्ज्ञ, विशेष् शिक्षक,विषय साधन व्यक्ती व रोखपाल यांनी शस्त्रक्रिया यशस्वी करीता पुढाकार घेतला.
दरम्यान शस्त्रक्रिया झालेली मूल अगदी सुस्थितीत आहेत. गट साधन केंद्र येथील सावली येथील कर्मचारी बंडू भेले, कु. प्रिया गोडघाटे, अमोल भोयर, यांनी मुलांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा उद्देश ठेऊन मुलांना शास्त्रक्रिये दरम्यान योग्य ती मदत केली. मुलाच्या नातेवाईकांनी गट साधन केंद्र सावली येथील कर्मचाऱ्यांचे मनापासुन आभार मानले व अभिनंदन केले. गट साधन केंद्राच्या या मदत कार्याचे सावली तालुक्यात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये