आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघोली बुटी येथील उच्च शिक्षित सरपंच पायउतार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा.शेखर प्यारमवार

सावली तालुक्यातील वाघोली बुटी येथील सरपंच यमुताई मेश्राम यांना दी. ३१ जुलै रोजी पायउतार होण्याची वेळ आली.
सावली तालुक्यातील वाघोली बुटी हे शेवटच्या टोकावर असलेले गाव असून या गावात ७ ग्रामपंचायत सदस्य संख्या आहे. २ वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतचे सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा समर्थित ४ तर काँग्रेस समर्थित ३ सदस्य निवडून आले होते. त्यावेळेस सरपंच पद हे अनुसूचित जाती साठी राखीव असल्यामुळे येथील उच्च शिक्षित असलेली भाजपा समर्थित कु. यमूताई मेश्राम या सरपंच पदावर विराजमान झाल्यात

कालांतराने ग्रामपंचायत सदस्यां मध्ये भांडणाचे स्वरूप आल्यामुळे येथील ६ ग्रामपंचायत सदस्यांनी १) ग्रामपंचायत सभेला हजर नसणे २) गावामध्ये हजर नसणे ३) ग्रा. पं. सदस्यांसोबत व जनतेशी उद्धटपणाने वागणे ४) आंगांनवाडी पोषण आहाराचे चेक वर सह्या न मारणे ५) रोजगार सेवकांची निवड झाली असताना सुद्धा त्यावर सह्या न करणे असे कारणे सरपंच यांच्या यांच्या विरोधात टाकून तशी तक्रार दि. २५ जुलै रोजी सावली तहसीलदार यांच्याकडे टाकण्यात आले होते . त्या संबंधाने दीं. ३१ जुलै रोजी सावली चे तहसीलदार पाटील यांनी वाघोली बुटी येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सभेत सरपंच यांच्या विरोधात १ विरुद्ध ६ मताने पारित झाल्यामुळे येथील सरपंच यमुताई मेश्राम यांना पायउतार व्हावे लागले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये