अंमली पदार्थ पदार्थ सेवन करु नये आणि वाहतूक शाखेचे कसे पालन करावे
विलास पाटील पोलिस निरीक्षक यांनी केले मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि 26/06/26 रोजी सकाळी 11/00 ते 12/00 वाजेच्या दरम्यान पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल वर्धा यांच्या मार्गदर्शन नुसार वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांच्या कडून सेंट ऍंथोनी स्कुल मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना वाहतूक नियम जनजागृती बाबत व मादक अंमली पदार्थांचे सेवण करू नये याबाबत कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळांमध्ये पोलीस निरीक्षक विलास पाटील व फौजदार रियाज खान यांनी विद्यार्थी, पालक आणि शाळा प्रशासन यांना मार्गदर्शन केले त्यात वाहतूक नियमांचे पालन करावे, हेल्मेटचा वापर करावे अपघात टाळावे शाळा परिसरात जवळपास कोठेही तंबाखू सिगरेट खर्रा विक्री होत असेल तर पोलिसांना माहिती द्यावी ड्रग्ज फ्री वर्धा कोणतेही व्यसन अंमली पदार्थ सेवन करू नयेत, काही अंमली पदार्थ खरेदी विक्री बाबत काहीही माहिती असल्यास याबाबत पोलिसांना त्वरित माहिती द्यावी
स्कुल बसेस मध्ये ही चालक व क्लीन्नर यांनी ही विद्यार्थी सुरक्षे कडे विशेष लक्ष दयावे आपले स्कूल बस ही कमी वेगामध्ये चालवावे, रोडचे बाजूला योग्य ठिकाणी वाहन उभे करावे, विद्यार्थी नेण्यासाठी त्यांचे पालक आल्याशिवाय लहान मुलांना रोडवर सोडून जाऊ नयेत विद्यार्थी समोर स्कूल बस मध्ये कोणीही तंबाखू गुटखा खर्रा खाऊ नये लहान मुलावर त्याचा वाईट प्रभाव पडत असतो चालकाचे क्लीन्नर यांचे ही मेडिकल.स्कूल व्यानचीही फिटनेस तपासाणी ही पोलीस सतत करीत राहील स्कूल व्यान मध्ये पोलीस मदत करिता निशुल्क फोन नंबर 112 अंबुलेन्स मदत नंबर 108. महिला बालक मदत टोल फ्री नंबर 1098 हे फोन नंबर स्कूल व्यान मध्ये दर्शनी भागावर लिहावे चालक क्लीन्नर यांना ड्रेसकोड, ओळखपत्र नियमितपणे दयावे
आपले शहर हे अपघात मुक्त शहर व अंमली पदार्थ मुक्त शहर करण्यास सर्वांनी सहकार्य पोलिसांना करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी आज सेंट ऍनथोनी स्कूल मधील जनजागृती कार्यक्रम मध्ये केलेले आहे,
पोलीस निरीक्षक विलास पाटील वाहतूक शाखा वर्धा..



