अवैद्य दारुभट्टी वर पोलीस स्टेशन सेलूची दमदारपणे कारवाई एकुण 9 लाख 67 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 25/06/2026 रोजी पोलीस स्टेशन सेलू अंतर्गत पारधी बेडा जामणी शिवार येथे तीन पोलिस अधिकारी सोळा पोलीस अंमलदार व दहा होमगार्ड सैनिक यांना सोबत घेवुन अवैद्य दारुभट्टी बाबत वॉश आऊट मोहीम राबविण्यात आली असून यावेळी येथे प्रो.रेड घालून मोक्यावर कारवाई करुन एकुण 9,67,000/-रु.चा मुद्देमाल जप्त करुन नष्ट करण्यात आला या कारवाई आरोपी नामे व आरोपी नंबर 1) अश्विनी काळे (पसार) आरोपी नंबर 2) रुपेश भोसले (पसार) दोन्ही रा. पारधी बेडा जामणी ता. सेलू यांचे विरुध्द पोलीस स्टेशन सेलू येथे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे आरोपीतांचे मनामध्ये दहशदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर ची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे वर्धा, प्रमोद मकेश्वर उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सेलू चे ठाणेदार पंकज वाघोडे, पोउपनि मुदमाळी, धनंजय पांडे, व पोलीस स्टाफ सुरेश मडावी, अखिलेश गव्हाणे, रामकिसन ईप्पर, सचिन उपाध्याय, शरंद इंगोले, ओमप्रकाश तल्लारी, राजु ताबारे, ज्ञानदेव वनवे, सुरज बोरजे, व होमगार्ड सैनिक नेमणुक सेलू पोलीस स्टेशन तसेच जामणी येथील पोलीस पाटील सुरेश गडकरी यांनी केली आहे.



