ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस स्टेशन वर्धा शहर डि.बी. पथकाने मोटारसायकल चोरी व दारूविक्री करणा-यावर कारवाई करुन 1 लाख 52 हजारावर मुद्देमाल जप्त

प्रभारी ठाणेदार विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली डि. बी. पथकाने केली कारवाइ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा :_ दिनांक 24 जून 2026 रोजी सरकार तर्फे फिर्यादी नामें पोलिस हवालदार अभिजित वाघमारे वय 45 वर्ष बक्कल नंबर 1416 ड्युटी पोलिस स्टेशन वर्धा येथे कार्यरत असून यांना मुखबिरकडून माहिती मिळाली की आरोपी नामें निलेश धनराज सागर वय 34 वर्ष राहणार वरुड सेवाग्राम तहसील जिल्हा वर्धा हा काळया रंगाची बुलेट क्रमांक एम एच 32 ऐ वाय 6941 या दुचाकी वाहनाने गावठी मोहया दारू विक्री करीता घेऊन येत आहे अशी माहिती मिळताच पोलीस स्टेशन वर्धा शहर डि.बी. गुन्हे पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड व पोलिस हवालदार यांनी सापळा रचून सुपारी माता मंदिर हनुमान मंदिर जवळ बोरगाव मेघे वर्धा एक इसम काळया रंगाची बुलेट गाडीवर दारुची वाहतूक करित आहे त्याला पंचासमक्ष थांबवले असताना त्याची अंगझडती करण्यात आली त्यावेळी त्यांचाकडे गावठी मोहा दारू मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याला पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे आणून पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध क्रमांक 871 /2026 कलम 65 (ई)(अ ) मदाका सह कलम 3(1),181,130/177 मो.वा.का दाखल करण्यात आला असून त्यांच्या कडून मोहा दारूसह दुचाकी वाहन जप्त करण्यात आलेले आहे एकूण दारू व दुचाकी वाहनांसह 1,52,050/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधिक्षक श्री सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर, वर्धा यांच्या मार्गदर्शनात वर्धा शहर पोलीस स्टेशन चे प्रभारी ठाणेदार श्री विलास पाटील,पोलीस निरीक्षक वर्धा यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस हवालदार महेन्द्र पाटील, पोलीस हवालदार अभिजीत वाघमारे, पोलीस अंमलदार रंजीत भुरसे, पोलीस अंमलदार अमोल साळवन तसेच होमगार्ड सैनिक राहुल मेहता यांनी केली….

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये