ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात वर्ध्यात 29 जूनला विराट महामोर्चा

डॉ. भदंत राजरत्न व विशाल मानकर यांचे आवाहन, आरक्षण बचावासाठी समाज एकवटणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात व आरक्षण संरक्षणाच्या मागणीसाठी वर्धा येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी विराट महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

या मोर्चामार्फत संविधानातील समानता, सामाजिक न्याय आणि अनुसूचित जातींची एकसंघता कायम ठेवण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. अनुसूचित जाती हा एकसंघ घटक राहावा, अशी भारतीय संविधानाची भूमिका आहे. त्यामुळे उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेऊन विद्यमान आरक्षण व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच उपवर्गीकरणासंदर्भातील अहवाल सार्वजनिक करण्यात यावा व सर्व घटकांना न्याय मिळेल अशी भूमिका शासनाने घ्यावी, असेही यावेळी नमूद करण्यात आले. हा विराट महामोर्चा सोमवार, दिनांक 29 जून 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, वर्धा येथून निघणार असून बजाज चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरापर्यंत जाणार आहे. या मोर्चामध्ये सामाजिक न्याय, संविधान संरक्षण व आरक्षण बचावाच्या मागण्यांवर भर देण्यात येणार आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. भदंत राजरत्न व विशाल मानकर करणार असून, समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन अनिल जवादे, विशाल मानकर डॉ. भदंत राजरत्न, किशोर खैरकार, एडवोकेट ज्योती कोमलकर, अर्चना नाखले, सावित्री नाखले, रंजना ढाले यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये