ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देऊळगाव राजा येथे मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांचा स्मृती दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देऊळगाव राजा येथे मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांचा स्मृती दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
याप्रसंगी विश्वविद्यालयाच्या प्रमुख सुनंदा दिदी, शाहू मॅडम, विमल शिंगणे, रमेश कौशिक, प्रल्हाद ढोरे, शिवाजी शेळके उपस्थित होते,
सुनंदा दिदी यांनी मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करून अभिवादन केले
सुनंदा दिदी यांनी बोलताना सांगितले की मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांनी विश्व शांती साठी मोलाचे योगदान दिले, त्यांनी आपल्या जीवनात पवित्रता, सहनशीलता, नम्रता, आणि सेवा याला प्राधान्य दिले, त्यांचे संपर्ण जीवन आपल्या साठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले,



