ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने राजश्री शाहू महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची१५२वी जयंती व तिथीप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना , सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा,जेष्ठ नागरिक संघटना, जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने वतीने विरंगुळा भवन आठवडी बाजार परिसर येथे साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष श्री बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गोविंदराव अहिरे, प्रा.विनायक कुळकर्णी, पत्रकार सन्मती जैन, होते यावेळी श्री.अरुण सपाटे, अरुण खरात, मधुकरराव धुळे, रमेश नरोडे, प्रा.विजय रायमल,प्रा.अशोक डोईफोडे, बाबुलाल शिवरकर, शांतिलालजी निरफळे, घनश्याम भंडारे, उपस्थित होते. सर्वप्रथम राजश्री शाहू महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, उपस्थित मान्यवरांनी राजर्षी शाहु महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार सचिव श्री गोविंदराव बोरकर यांनी केले शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये