ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवळी पोलीसांनी वायगांव निपाणी येथे सतीश नांदे यांचं घरी रेड करुन प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा केला जप्त

संदीप कापडे ठाणेदार यांची कार्यवाही हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा व पान मसाल्याची बेकायदेशीर विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध सुरु असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत देवळी पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक 25/06/2026 रोजी यशस्वी कारवाई केली.पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वायगाव निपाणी येथे सापळा रचून छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपी श्री. श्री. सतीश गंगाधर नांदे यांचे घर, देशमुख लेआउट, वार्ड क्र. ५, वायगाव (नि), तह. वर्धा, जि वर्धा याच्या घरझडतीतुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाला व इतर तंबाखूजन्य पदार्थाचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :

– प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जनम तबाखु 50 पैकेट

– गुटखा भाग्य 363 पॅकेट

– तंबाखू रत्ना तबाखु 10 टिन

500 ग्रॅम खर्रा

– एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 32,826/- रुपये

प्राथमिक तपासात सदर प्रतिबंधित मालाची बेकायदेशीर विक्री व वितरण करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006, 3, 26, 27, 30, 59, सहकलम भारतीय न्याय संहीत कलम 123, 223, 274, 275 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रतिबंधित मालाचा पुरवठादार, वितरक व इतर संबंधित व्यक्तींचा शोध घेण्याचे कामही सुरु आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल वर्धा, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सदाशीव वाघमारे वर्धा, उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले मॅडम पुलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन देवळीचे ठाणेदार श्री. संदीप कापडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष दरवरे, पोहवा, गणेश बावणे अंमलदार पोशी. पंकज चामचोर, अमित पटले तसेच अन्न व सुरक्षा विभागाचे अधीकारी श्री. टोपले, व त्याचे सहकारी अधिकारी यांनी सदर कार्यवाही केली.

वर्धा जिल्हा पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची विक्री, साठवणूक अथवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.

“सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सातत्याने सुरू राहतील.”

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये