ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

र्धा पोलीस दलातर्फे ‘आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिना’ निमित्त भव्य रॅली संपन्न

नागरिकांना व्यसनमुक्तीचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नशामुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीविषयी व्यापक जनजागृती घडवून आणण्यासाठी आज २६ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून वर्धा पोलीस दलातर्फे वर्धा शहरात भव्य जन जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘Say No to Drugs – Say Yes to Life’ या मुख्य संदेशासह ही रॅली काढण्यात आली. या भव्य रॅलीला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी, पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, नगराध्यक्ष श्री. सुधीर पांगुळ, सेवाग्राम हॉस्पीटल फॉरेन्सीक विभागाचे तज्ञ डॉ. इंद्रजित खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

व्यसनमुक्त वर्धा – सुरक्षित भविष्याची दिशा’ आणि ‘नशामुक्त समाज, आपली जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या रॅलीमध्ये वर्धा पोलीस दलासोबतच जिल्ह्यातील पोलीस पाटील, होमगार्ड्स, एन.सी.सी. कॅडेट्स, पोलीस बॉईज व त्यांचे कुटुंबीय, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थीनी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच वर्धा शहरातील नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आज रोजी सकाळी ८:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वर्धा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. पंकज भोयर यांचे शुभ हस्ते हिरवी झेंडी दाखवुन रॅलीची सुरुवात करण्यात आली. मा. पालकमंत्री सह सर्व मान्यवरांनी स्वतः रॅलीत प्रत्यक्ष सहभाग घेतला. रॅली झाशी राणी चौक, सीमा मेडिकल जवळून, बडे चौक ते इंगोले चौक, वंजारी चौक मार्गे पुढे मार्गस्थ झाली, शेवटी अनेकांत स्वाध्याय मंदिर हॉल, वर्धा येथे सांगता समारोप कार्यक्रम घेण्यात आला. मा. मान्यवरांच्या उपस्थीतीत सर्वांनी नशेपासून दूर राहून चांगला समाज घडविण्यासंबंधी शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले. जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी. आणि सेवाग्राम हॉस्पीटल फॉरेन्सीक विभागाचे तज्ञ डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी रॅलीत सहभागी उपस्थितांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृतीपर मार्गदर्शन केले व अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक “राष्ट्रगीत” घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या रॅली व कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘नशा सोडा जीवन जोडा’, ‘सुसंस्कृत समाज घडवूया नशामुक्त वर्धा घडवूया’ असा महत्त्वपूर्ण संदेश संपूर्ण वर्धा शहरात देण्यात आला. वर्धा शहराला प्रगत, सुरक्षित व सशक्त बनवण्यासाठी सर्व नागरिकांनी व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन वर्धा पोलीसांतर्फे आणि उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले.

(विनोद चौधरी) पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये