ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांची पुणे येथे बदली

सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांचे स्थानांतर पिंपरी चिंचवड पुणे येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर झाली आहे.

देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जनसेवा सामाजिक संघटना व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने मनिषा कदम यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या

यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी, सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड, रमेश नरोडे, प्रकाश अहिरे, शांतीलाल निरफळे, प्रा अशोक डोईफोडे, घनश्याम भंडारे, मधुकर धुळे,अरुण सपाटे, तथा इतर उपस्थित होते, यावेळी प्रकाश खांडेभराड, शांतीलाल निरफळे, रमेश नरोडे यांनी मनिषा कदम यांच्या कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, मनिषा कदम यांनी सत्काराला उत्तर देताना कृतज्ञता व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये