ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरी शिक्षण महाविद्यालयात पदवीदान समारंभ संपन्न

पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरवचिन्हांसह सन्मान 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

प्रत्येक विद्यार्थ्याचे पदवी प्राप्त करण्याचे स्वप्न असते. अतिशय कष्टाने विद्यापीठाची पदवी मिळवतात. ही पदवी सगळ्यांच्या समोर सन्मानाने मिळावी असे प्रत्येक विद्यार्थ्याला मनापासून वाटत असते. विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे त्यांनी केलेल्या कष्टाचा गौरव असतो. विद्यापीठात पदवीदान समारंभात प्रत्येक विद्यार्थ्याला पदवीदान करणे शक्य होत नाही. म्हणून महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना पदवीदान केल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत होत असतो. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याकरिता गोंडपिपरी शिक्षण महाविद्यालय, गोंडपिपरी येथे पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सत्र २०२४-२५ या सत्रातील पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या रश्मी मोटघरे तर प्रमुख अतिथी म्हणून कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. लता जांभूळकर तसेच प्रा. वृषाली पोफळी आणि प्रा.पराग अलोने मंचावर उपस्थित होते. सत्र २०२४-२५ मध्ये सर्वाधिक गुण मिळवलेले विद्यार्थी प्रथम क्रमांक अक्षय बुऱ्हाण, द्वितीय क्रमांक डिंपल देवहारे व तृतीय क्रमांक ऐश्वर्या सांगोळे आणि शीतल कंबलवार या विद्यार्थ्यांना गौरवचिन्हासह पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आणि उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवीचे वितरण करण्यात आले.

यावेळी प्रा. लता जांभूळकर यांनी पदवीदान समारंभाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रा. रश्मी मोटघरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून पदवीचे महत्त्व सांगताना “पदवी म्हणजे आपल्या आयुष्याची खरी जमापुंजी आहे” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एड. प्रथम वर्षाचा विद्यार्थी शुभम मुरमुरवार याने केले, तर आभार प्रदर्शन प्रा.वृषाली पोफळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विनोद लभाने, साईनाथ काळे तसेच बी. एड. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये