ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीस दल अंतर्गत पोलीस स्टेशन देवळी व्दारा आयोजीत पोलीस युवा महासंवाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक १०/०८/२०२६ रोजी वर्धा जिल्हा पोलीस दल अंतर्गत पोलीस स्टेशन देवळी व्दारा आयोजीत पोलीस युवा महासंवाद विदयार्थी, पालक आणि युवतीसाठी जनजागृतीपर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाकरीता मार्गदर्शनाचे प्रमुख विषय १) करीअर घडविण्याचासाठी योग्य दिशा, २) सोशल मीडीयाचा गैरवापार व सायबर गुन्हयापासुन संरक्षण ३) वाढते व्यसन व त्याचे शाररीक, मानसीक आणि सामाजिक दुष्परीणाम ४) न समजलेले माय बाप (किशोरवयीन विद्यार्थाचे प्रेम संबधातुन होणारे नुकसान) असे असुन त्या करीता प्रमुख व्यक्ते डॉ. रोजाना राणा (मानसोपचार तज्ञ, नागपुर), डॉ. तन्मय दिक्षीत (सायबर एक्सपर्ट नाशीक), डॉ सुधीन भावे (मानसोपचार तज्ञ, नागपुर), श्री. वसंत हंकारे (प्रसिध्द वक्ते, सांगली) असे हजर होते. पोलीस स्टेशन देवळी हददीतील एकुण १) जनता विघालय देवळी, २) मारीया स्कुल देवळी, ३) नगर परीषद विघालय, ४) यशंवत कन्या शाळा, ५) सुजन विघालय देवळी ६) एस.एन. जे विघालय देवळी, ७) ज्ञानभारती महाविघालय, देवळी ८) आय.टी.आय समृध्दी, देवळी ९) आय.टी.आय तडस, देवळी, १०) गुरूकुल विघालय देवळी, इत्यादी शाळा व कॉलेजचे एकुण ४,५०० विदयार्थी सहभागी होते तसेच त्याचे पालक वृदं ७०० असे एकुण ५,२०० पोलीस युवा महासंवाद कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते.

सदरचा पोलीस युवा महासंवाद कार्यक्रम हा मा. पोलीस अधीक्षक, श्री. सौरभकुमार अग्रवाल सा, (भापोसे), मा.अपर पोलीस अधीक्षक, श्री. सदाशिव वाघमारे सा., मा. सहा. पोलीस अधीक्षक, डॉ. वंदना कारखेले, उपविभागीय पो.अ. उपविभाग पुलगाव, यांचे मार्गदर्शनाखाली मा. ठाणेदार सपोनि/संदीप कापडे, व पोलीस स्टेशन देवळी येथील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व होमगार्ड, पोलीस पाटील, यांनी सहकार्य केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये