ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समृध्दी एक्सप्रेसवे वर ट्रक आडवा लावनाऱ्या ट्रक चालकावर सावंगी पोलीसांची कठोर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. ०९/०८/२०२६ रोजी समृध्दी राष्ट्रीय महामर्ग, भारत पेट्रोलपंप जवळ, गणेशपुर शिवार येथे उप प्रादेशीक परीवहन अधिकारी, वर्धा हे त्यांचे भरारी पथकांतर्गत वाहनाचे कागदपत्रे चेक करणे, वाहनाचे ओव्हरलोड चेक करणे, मालवाहु वाहनांचे कागदपत्रे चेक करणे वाहन काद्याचे उल्लघन चेक करणाऱ्या वाहनावर कारवाई करीत असतांना येळाकेळी गावानण्तर मुबंई कडे जाणाऱ्या रोडवर पेट्रोलपंपाचे अगोदर समृध्दी महामार्गावर एक लॉग कन्टेनर क एच आर ५५ बि ए ८५४४ हा नो पाकींगमध्ये थांबुन दिसला. त्यानंतर उप प्रादेशिक परीवहन वर्धा अधिकारी यांनी सदर कन्टेरनचे कागदपत्रे चेक करून मलाच्या स्पेशल परमिट बाबत विचारपुस केली असता वाहन चालकाने परमीट नसल्याचे सांगितल्याने परीवहन अधिकारी वर्धा यांनी परमिट नसल्याबाबत चालान केले. सदर ट्रकला चालान दिल्याच्या रागावरून दुपारी १४.३० वा. दरम्यान ट्रक क एच आर ५५ बि ए ८५४४ चा चालक नामे राजुलाल बलाई रा. मुशी बनेरा जि भिलवारा राजस्थान याने त्याचे ताब्यातील ट्रक (कन्टेनर) हा समृध्दी महामार्ग या महाराष्ट्र एक्सप्रेस वे २ राष्ट्रीय महामार्गावर वाहने ताशी १२० किमी वेगाने चालतात व ति त्यांच्या कंटेनर ला धडकुन अपघात होवुन प्रवाशचा मृत्यु होवु शकतो. याची जागिव असुन देखील त्याने आपला ट्रक (कन्टेनर) रोडवर आडव्या स्थितीत उभा करून प्रवाशंचा मृत्यु घडुन येईन असा प्रयत्न करून रोड ब्लॉक केला. तसेच शासकिय अधिकारी हे त्यांचे कायदेशीर कर्तव्य पार पाडीत असतांना त्यांना अटकाव केला.

सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ सांवगी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री विनोद गिरी पोलीस निरीक्षक हे पोलीस स्टॉफसह घटनास्थळी पोहचुन सदर ट्रक (कन्टेनर) चालक नामे राजुलाल बलाई रा. मुशी बनेरा जि भिलवारा राजस्थान यास ताब्यात घेवुन त्याचे वर कलम ११०, १२१(१), १२६ (२),१३२, २२१, २८५ भारतीय. न्याय संहिता सह कलम ८ (ब) राष्ट्रीय राज्यमार्ग कायदा अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. व त्यांने समृध्दी महामार्गावर आडवा लावलेला ट्रक कन्टेनर क एच आर ५५ वि ए ८५४४ तेथुन काढुन वाहतुक सुरळीत केली. तसेच सदरचा ट्रक जप्त करण्यात आला. पोलीसांकडुन ट्रक चालकांना आव्हान आहे. कि त्यांनी असे कृत्य करू नये, केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

सदरंची कारवाई श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा, श्री सदाशिव वाघमारे, अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा, श्री सुनील महाडीक, उपविभागिय पोलीस अधिकारी वर्धा, यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे चे ठाणेदार श्री विनोद गिरी, पोउपनी मनोज टिपले, पोहवा अनील वैद्य, विरेंन्द्र कायंळे, हर्षल मुन, राहुल नागापुरे, अंकुश रामटेके, अभय खोब्रागडे, श्याम सलामे, गौरव नरताम, व महामार्ग पोलीस वर्धा यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनी मधुकर सामलवार हे करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये